क्रिडाताज्या घडामोडी

टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैनाच्या अडचणीत वाढ

ईडीने सुरेश रैनाला समन्स बजावलं

मुंबई : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयच्या निशाण्यावर आला आहे. ईडीने सुरेश रैनाला समन्स बजावलं आहे. त्यानुसार सुरेश रैनाची बुधवारी 13 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. सुरेश रैना याला एका बेटिंग ॲपचा प्रचार केल्याबद्दल ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीने काही महिन्यांपूर्वी बंदी घातलेल्या बेटिंग वेबसाइट आणि ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल अनेक सेलिब्रिटींना नोटीस पाठवली होती. यात सुरेश रैना याचंही नाव होतं.

हेही वाचा    :    अरबी समुद्रात लष्करी हालचाली वाढल्या : भारत-पाकचा मोठा निर्णय : काहीतरी भयंकर घडत आहे?

केंद्र सरकारकडून 1xBet, Parimatch यासह अनेक ॲप आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. मात्र त्यानंतरही हे सर्व ॲप्स आणि वेबसाइट वेगवेगळ्या नावांनी कार्यरत आहेत. तसेच जाहीराती केल्या जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, सेलिब्रिटी प्रमोशन करत असल्याने या बंदी घातलेल्या ॲप्स आणि वेबसाईटला प्रसिद्धी मिळते. या प्रकरणात रैनाचं नाव समोर आलंय. रैनानेही याचं प्रमोशन केलं होतं. त्यामुळे रैनाला बुधवारी 1xBet संदर्भात चौकशी केली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button