Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कर संकलन विभागाची ऑनलाईन सेवा नागरिकांसाठी ठरतेय उपयुक्त!

चार वर्षात ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला थकबाकी नसलेल्याचा दाखला

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी नसलेला दाखला बसल्या मिळावा यासाठी मार्च २०२२ पासून ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत १३,२१३ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा कार्यालयात फेरफटका मारावा लागत असल्यामुळे नागरिकांना वेळ आणि श्रमाचा अपव्यय होत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी, कर आकारणी विभागाने महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

२०२२ ते जुलै २०२५ पर्यंत एकूण ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने थकबाकी नसल्याचा दाखला घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ते घरबसल्या विना शुल्क दाखला डाउनलोड करू शकतात.

हेही वाचा    :     सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील

वर्षानुसार ऑनलाईन दाखले घेणाऱ्यांची संख्या:

२०२२- २३ : ४,७२५
२०२३- २४ : १६,९०६
२०२४-२५ :२९,७५७
२०२५- २६ (जुलै अखेरपर्यंत) :१३,२१३

महापालिकेच्या कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मालमत्ता कर विभागाने सुरू केलेली ‘थकबाकीदार नसल्याच्या ऑनलाईन दाखल्याची’ सुविधा हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना कोणतीही अडचण न येता आवश्यक कागदपत्रे सहज मिळावा, हाच आमचा उद्देश आहे.

– प्रदीप जांभळे पाटील- अतिरिक्त आयुक्त पिंपरी- चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

थकबाकीदार नसल्याचा दाखला ऑनलाईन मिळू लागल्यामुळे नागरिकांची खूप मोठी गैरसोय टळली आहे. आधी लोकांना कार्यालयात यावं लागायचं, वेळ जात होता, कागदपत्रांची दगदग होती – आता हे सगळं टळलं आहे. नागरिक घरबसल्या ही सेवा वापरत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. ही सुविधा आणखी सोपी आणि उपयुक्त कशी करता येईल, यावर आमचा भर आहे.

– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त कर संकलन विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button