सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार; एसटीची भाडेवाढ होणार?

MSRTC | आजकाल सर्वसामान्य नागरिक एसटीने प्रवास करण्याला जास्त प्राधान्य देतात. मात्र आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता एसटी प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. कारण त्या प्रकारचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. तसेच एसटीच्या भाडेवाढीत १४.९५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळाने ठेवला आहे. मात्र यावर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली आहे.
भरत गोगावले म्हणाले की, गरीब लोकांना चांगली सेवा द्यावी असा आमचा प्रयत्न आहे. लालपरी सेवा सर्वत्र पोहचवते. पण महामंडळाकडे बसेस कमी आहेत. नवीन वर्षांमध्ये तीन ते साडेतीन हजार नव्या बसेस आम्ही आणत आहोत. यातील काही नवीन बसेस घेतोय तर काही भाडे तत्वावर घेतोय. अशोक लेलँडच्या २२०० बसेस आपण यामध्ये आणतोय. नव्या बसेस आल्यावर जुन्या बसेस स्क्रप कराव्या लागतील. त्यामुळे अपघात कमी होतील. यंदा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढही करण्यात आली आहे.
हेही वाचा – विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
गेली तीन वर्षे महामंडळाने भाडेवाढ केली नव्हती. त्यामुळे आता काही प्रमाणात भाडेवाढ केली जाईल. १४.९५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव महामंडळाकडून ठेवण्यात आला आहे. त्यावर राज्य सरकार निर्णय घेईल अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली.
बस स्थानक स्वच्छ करण्याचा प्रयत्न आमचा असेल. बस स्थानक स्वच्छ नाहीत या मताशी मी सहमत आहोत. आम्ही जरी तोट्यात असलो तरी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू असं भरत गोगावले म्हणाले.





