Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाशिक फाटा उड्डाणपुलाखालील रस्ते झाले धोकादायक

पिंपरी :  नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली सखल भागात पाणी साचून रस्ता खराब होऊन धोकादायक झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते बनविण्यात आले आहेत.

मात्र, काही ठिकाणी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांमुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. भोसरीकडून पुणे मार्गाकडे जाणाऱ्या नाशिक फाटा चौकात उतरल्यावर खड्डे पडलेले दिसत आहेत.त्यामुळे नाशिक फाट्यावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी महापालिकेला केली आहे.

हेही वाचा     –        मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडा बांधणार २३९८ परवडणारी घरे, कधी निघणार लॉटरी?

मागील काही दिवसांपूर्वी पावसाचे पाणी जमिनीत मुरुन रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. नाशिक फाटा चौकात अपघात होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रस्त्यावर डांबरीकरण केले होते. परंतु, पुन्हा पाऊस झाल्याने ते रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले दिसत आहेत.

पुणे-नाशिक फाटा मार्ग पुणे-मुंबई महामार्ग तसेच पिंपरी, कासारवाडी, भोसरी, पिंपरी गुरव या उपनगरात या चौकातून जाण्याचा मार्ग आहे. नाशिक फाट्यावरून खाली उताराने वळण घेऊन पुणे मार्गावर जाताना पुलाखाली धोकादायक खड्डे पडलेले दिसतात. खड्ड्यात चाक जाऊन वाहन पलटी होण्याची भीती आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button