इस्रोने गाठला मोठा टप्पा! भारत आता अवकाशात पाठवू शकतो माणूस

ISRO | भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो बऱ्याच काळापासून अवकाशात भारताकडून अवकाशवीर पाठवण्यासाठी काम करत असून अलीकडेच सरकारने यासाठी मिशन २०४० ची तयारी केली आहे. मिशन गगनयानच्या माध्यमातून भारत अवकाशात मानव पाठवण्यासाठी काम करेल.
इस्रोने CE20 Cryogenic Engine साठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मिशनच्या अजून जवळ आला आहे. इस्रोने २९ नोव्हेंबरला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ही टेस्ट केली.
हेही वाचा – ‘मलाईदार खात्यांसाठी महायुतीत प्रयत्न सुरू’; काँग्रेस नेत्याची सरकारवर टीका
मानवी मिशनसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. CE20 क्रायोजेनिक इंजिनचा विकास स्वत: इस्रोने केला आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरने हे इंजिन डेवलप केलय. हे इंजिन १९ टनाच थ्रस्ट लेवल ऑपरेट करु शकते. अलीकडेच या इंजिनला अपडेट करुन २० टन कॅपेसिटीच बनवण्यात आलं आहे. गगनयान मिशनमध्ये हे इंजिन वापरण्यात येईल. क्रायोजेनिक इंजिनशिवाय मानवाला अवकाशात पाठवणं शक्य नाही.





