IND vs AUS | ऑस्ट्रेलिया संघ १०४ वर ऑल आऊट, बुमराहच्या ५ विकेट्स

IND vs AUS | बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या दिवशी ६७ धावांवर सात विकेट गमावल्यानंतर आज (दि.२३) ३७ धावांत उर्वरीत तीन विकेट ऑस्ट्रेलियाने गमावल्या. टीम इंडियाला दुसर्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या.

ॲलेक्स कॅरीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला आज पहिला धक्का बसला. बुमराहने त्याला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. कॅरीने २१ धावा केल्या. यानंतर नॅथन लायन हा हर्षित राणाचा बळी ठरला. त्याला पाच धावा करता आल्या. भारताने पहिल्या तासातच या दोन्ही विकेट घेतल्या होत्या. मात्र, स्टार्क आणि जोश हेझलवूड या शेवटच्या जोडीला बाद करायला टीम इंडियाला एक तास लागला. स्टार्क आणि हेजलवूड यांनी 110 चेंडूत 10व्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. स्टार्कने 112 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. हर्षितनेच त्याला शिकार बनवले. हेजलवूड सात धावा करून नाबाद राहिला. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या.





