‘एक हैं तो सेफ है’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा

Narendra Modi | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. याच घोषणेचा वापर भाजपाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता आणखी एक नवीन घोषणा दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही घोषणांची सध्या चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे आणि नाशिकमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. अनुसूचित जाती आणि जमातीतील एकजूटता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. ही एकजूटता काँग्रेसला सहन होत नाही. देशभरातील आदिवासी जातींना एकमेकांविरोधात लढवणे हाच काँग्रेसचा मुख्य अजेंडा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा – ‘सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस’; सुप्रिया सुळेंचा दावा
काँग्रेस अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरोधात उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. आदिवासी जर एकत्र आले, तर त्यांची ताकद वाढेल आणि वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेले, तर त्यांची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणतो की ‘एक हैं तो सेफ है’. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा हा डाव हाणून पाडायचा आहे. आपल्याला विकासाच्या वाटेवर पुढे जायचं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.




