ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मोहोळसाठी शरद पवारांचा आश्चर्याचा धक्का

माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे २६ वर्षी तरूण उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी देऊन आश्चर्याचा धक्का दिला. मोहोळमधून अनेक नावांची चर्चा होती. मात्र माजी आमदार रमेश कदमही इच्छुक होते. पण शरद पवार यांच्या गटाने त्यांच्या मुलीला सिद्धी कदम हिला उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहोळ विधानसभेत अजित पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात सिद्धी कदम असल्याचे या दोघांमध्ये तगडी टक्कर होणार आहे.

तर मोहोळ मधून सोमेश क्षीरसागर, राजू खरे, संजय क्षीरसागर आणि रमेश कदम हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र तिकीटाची माळ सिद्धी कदम यांच्या गळ्यात पडली. सोमेश क्षीरसागर, राजू खरे हे शिंदे गटात असले तरी मोहोळची जागा अजित पवार गटाला सुटल्याने ते शरद पवार गटाकडून इच्छुक होते. दरम्यान, सिद्धी कदमांना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक नेते बंडखोरी करतात का याकडे तालुक्याच्या नजरा आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group