Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आरटीओ प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

पुणे :  सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेल्या स्कूल व्हॅन, बसची माहिती आरटीओच्या वेबसाइटवर येत्या १५ दिवसांत भरावी, असे आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केले आहेत.

आरटीओ प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून ज्या शाळा ही माहिती भरणार नाहीत त्यांना आता शिक्षण विभागाही नोटीस बजावणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.पुण्यात वानवडी परिसरात स्कूल व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. शहराच्या अन्य भागातही अशा घटना समोर येत आहेत. यापार्श्वभमीवर सतर्कता बाळगली जात आहे.

हेही वाचा –  ‘‘नराधमाला आमच्या ताब्यात द्या’’; आमदार महेश लांडगेंची थेट पोलीस ठाण्यात धडक!

शहरात सहा हजार स्कूल व्हॅनची नोंदणी असताना त्यापैकी साठ टक्केच स्कूल व्हॅन चालकांनी योग्यता प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले होते.त्यामुळे खरच विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होते का? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आरटीओने आता या सर्व स्कूल व्हॅनची तपासणी सुरू केली आहे. त्याबरोबरच शाळांनी देखील स्कूल व्हॅन व बसची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

आरटीओने एक वेबसाइट तयार केली आहे. त्या वेबसाइटवर स्कूल व महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व स्कूल बस व व्हॅनची माहिती टाकणे बंधनकारक केले आहे.त्यामध्ये स्कूल व्हॅनचा नंबर, त्यामधून वाहतूक होत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यावर अटेंडन्स आहे का अशी माहिती देणे गरजेचे आहे. ही माहिती येत्या पंधरा दिवसात टाका अशा सूचना आरटीओकडून शाळा व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button