Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका राबविणार अभिनव उपक्रम

पिंपरी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरच रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम सुरू करणार आहे. हा अभिनव उपक्रम रस्त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, खड्डे असलेले परिसर ओळखण्यासाठी आणि रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) एकत्रित केलेली रस्त्यांची माहिती महापालिकेच्या भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) प्लॅटफॉर्ममध्ये संकलित केली जाईल. या माहितीद्वारे सततची होणारी खड्डे दुरुस्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून शहराच्या रस्त्यांची एकूण गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात साधारण १ हजार ७०० किलोमीटर लांबीचे क्रॉक्रीट व डांबरी रस्ते आहेत. या रस्त्यांची प्रत्यक्ष तपासणी आणि संरचनात्मक मूल्यांकनांद्वारे (स्ट्रक्चरल असेसमेंट) खड्डे दुरूस्ती कामांच्या गुणवत्ता वाढीला प्राधान्य दिले जाणार आहे. रस्ते दुरुस्ती आणि सुधारणांसाठी तसेच महापालिकेच्या अंदाजपत्रकाचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये पहिला अहवाल सादर करण्यात येणार असून तीन वर्षांसाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

हेही वाचा    –      ‘वर्षा’ निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन 

सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून रस्ता खचणे, खड्डे पडणे तसेच भेगा पडणे यांसारख्या प्रमुख समस्यांची नोंद केली जाईल आणि वार्षिक देखभाल अहवाल तयार करण्यासाठी तसेच खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआयएस-आधारित ऍप देखील विकसित केले जाणार आहे, ज्यामुळे एकाच ठिकाणी सततची होणारी रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे टाळण्यास मदत होईल.

रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम रहिवाशांना सुस्थितीत आणि सुरक्षित रस्ते प्रदान करण्याच्या महापालिकेच्या वचनबद्धतेमधील एक महत्वाचा टप्पा आहे. स्वयंचलित तंत्रज्ञान (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) आणि जीआयएस प्रणालीच्या आधारे रस्त्यांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यास तसेच अंदाजपत्रकातील नियोजन आणि रस्ते बांधणीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळणार आहे. सर्वेक्षणानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि देखभालीसाठी कंत्राटदार व संबंधित अधिकारी या दोघांनाही जबाबदार धरले जाणार आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक

 

सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून रस्ता खचणे, खड्डे पडणे तसेच भेगा पडणे यांसारख्या प्रमुख समस्यांची नोंद केली जाईल आणि वार्षिक देखभाल अहवाल तयार करण्यासाठी तसेच खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआयएस-आधारित ऍप देखील विकसित केले जाईल, ज्यामुळे एकाच ठिकाणी सततची होणारी रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे टाळण्यास मदत होईल.

– मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button