Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दादाचा वादा; राष्ट्रवादीचं नवं भन्नाट गाणं पाहिलं का?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे गाणे प्रदर्शित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. गाण्याचे नाव ‘दादाचा वादा’ असं आहे. गाणं चांगलं असून लोकांना ते आवडेल अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांच्या ‘एक्स’ हँडवर देखील हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. सांगून आलोया थांबायचं नाय आता, जिंकायचं हाय म्हणजे जिंकायचं हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर, मागं पुढे आता बघायचं नाय… धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा, धराधराधरा आता ध्यास आता एक धरा… जोश धगधगता अंगात रगरगता, ऐकणार नाय कुणा आता… असे गाण्याचे बोल आहेत.

हेही वाचा –  मोठी बातमी: आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात!

राज्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीमध्ये आहे. सध्या महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांची राज्यात जनसन्मान यात्रा सुरु आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळताना दिसत आहे.

अजित पवार गटाने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वर जास्त लक्ष दिले आहे. अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत गरीब महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ दीड ते दोन कोटी महिलांना मिळण्याची शक्यता आहे. मध्ये प्रदेशच्या धर्तीवर आणण्यात आलेल्या योजनेकडून महायुतीला प्रचंड आशा आहेत.

अजित पवार यांच्या गटाने लोकसभेमध्ये चार जागा लढल्या होत्या, त्यातील फक्त एका जागावर पक्षाला विजय मिळाला होता. लोकसभेसारखं अपयश विधानसभेला पाहायला मिळू नये यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. अजित पवारांनी विकास कामांच्या प्रचारावर भर दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group