ताज्या घडामोडी

प्रवाशांची पर्स व दागिने चोरणाऱ्या संशयित महिलेला मुद्देमालासह अटक

संशयितेची अंगझडती घेतली असता दहा ग्रॅम सोने देखील मिळून आले

नाशिक : रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स व दागिने चोरणाऱ्या एक संशयित महिलेला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. नाशिक रोड पोलिसांनी ही कामगिरी केली. आरती विनोद नानवटकर (वय ३२, रा. देवळाली गाव) असे संशयित महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेवून एक महिला ही प्रवासी महिलांच्या पर्स, दागिने चोरुन नेत असल्याचे प्रकार सुरु होता. याबाबत पोलिस ठाण्यात देखील तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.

या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून शोध घेतला जात असताना पथकातील अजय देशमुख, नाना पानसरे यांना मालधक्का परिसर, नाशिक रोड येथे दागिने चोरणारी संशयित महिला फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विजय टेमगर व गुन्हे शोध पथक महिला पोलिस पुना अहिरे आदींनी बुरी मज्जीत समोर येथून एक महिला संशयीतरित्या हालचाल करता असताना दिसून आली.

संशयितास पोलिसांनी विचारपूस करता तिने उडवाउडवीची उत्तरे देताच पोलिसांनी खाक्या दाखविताच तिने नाशिक रोड रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे बस मध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून बस, रेल्वेत चढणारे प्रवाशाचे पर्स, दागिने चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी संशयितेची अंगझडती घेतली असता दहा ग्रॅम सोने देखील मिळून आले. पोलिसांनी हे सोने जप्त करत संशयित आरती नानवटकर हिला अटक केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी, पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक प्रवीण सूर्यवंशी, तसेच गुन्हेशोध पथकाचे विनय टेमगर, विष्णू गोसावी, संध्या कांबळे, कल्पेश टेस्वार, केतन कोकाटे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्ता वाजे, योगेश रानडे, पुना अहिरे, सुप्रिया विघे आदींनी कामगिरी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button