Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘..तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार’; आमदार रवी राणा यांचं वक्तव्य

Ravi Rana | महायुती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. महिलांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहेत. मात्र, या योजनेवरून विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहेत. अशातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी या योजनेवरून धक्कादायक विधान केलं आहे. आशीर्वाद दिला नाही, तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपयेचे ३ हजार करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जे मला आशीर्वाद देणार नाही, मी तुमचा भाऊ असून १५०० रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. तर सरकार देत राहते. पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे.

हेही वाचा     –    वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावल्यास पडेल महागात! सरकार वसूल करणार ‘तब्बल’ इतकी जीएसटी 

दरम्यान, आमदार रवी राणा यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांना दिलेला पैसा तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button