मुंबई : १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मात्र, आता सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “जे काही घडले, त्याचे सर्व पुरावे असून अनिल देशमुख हे त्यांच्या पैसे पीएमार्फत पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – १०० रुपयात पाहा प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’, जाणून घ्या नेमका कसा?
जे काही आहे त्याचे सर्व पुरावे आहेत. ते त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत सीबीआयकडेही पुरावे आहेत. मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे. हे सर्व प्रकरणत त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे आणि मी एक लेटर लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे, असा आरोप सचिन वाझेंनी केला आहे.
https://twitter.com/ANI/status/1819564996072034725?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1819564996072034725%7Ctwgr%5E296567a3997c6fa1cda322ad35a790d71c229176%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmaharashtra%2Fanil-deshmukh-used-to-take-money-through-pa-serious-allegation-sachin-vaze-maharashtra-marathi-news-1302705
बातमी अपडेट होत आहे…




