महापालिकेतर्फे ‘सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धा’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी आणि रिलायन्स स्मार्ट बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धा’ आयोजित केली आहे.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित मुलांच्या ‘सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धे’मध्ये सहभागी होऊया आणि त्यांच्या बालमनावर आदर्श संस्कार करुया, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
हेही वाचा – ‘फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…’; शरद पवारांचे मोठे विधान
स्पर्धेमधील विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लिक करा. https://fxurl.co/uBUNs किंवा बायोमधील लिंकवर क्लिक करावे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख 17 जुलै आहे. पहिले बक्षीस 10000 रुपयाचे वाउचर, दुसरे बक्षीस 7000 रुपयाचे वाउचर आणि तिसरे बक्षीस 5000 रुपयाचे वाउचर असणार आहे.




