Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल, एका तोळ्याचे दर ऐकून ग्राहकही थक्क

Gold Silver Rate Today | सोने खरेदीदारांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात सोने जवळपास दोन हजार रुपयांनी महागले होते. तर त्यात ७७० रुपयांची पुन्हा घसरण झाली होती.
अशातच या आठवड्याची सुरुवात सोन्याने दरवाढीने झाली आहे. सोने ५०० रुपयांनी वधारले आहे. अशातच आज पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
हेही वाचा – ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा..’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,१२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,४११ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९३,५६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,२१५ रुपये प्रतिकिलो होती.




