HSC Result 2024 | बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, यंदाही मुलींची बाजी

पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. यंदा कोकण विभागाचा बारावीचा निकाल ९७.५१ टक्के लागला आहे तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९१. ९५ टक्के इतका लागला आहे.
यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुलं, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत.
विभागीय मंडळनिहाय निकाल
कोकण – ९७.५१
पुणे – ९४.४४
नागपूर – ९२.१२
छत्रपती संभाजीनगर – ९४.०८
हेही वाचा – सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल, एका तोळ्याचे दर ऐकून ग्राहकही थक्क
मुंबई – ९१.९५
कोल्हापूर – ९४.२४
अमरावती – ९३.००
नाशिक – ९४.७१
लातूर – ९३.३६
शाखानिहाय निकाल
कला – ८५.८८ टक्के
वाणिज्य – ९२.१८
विज्ञान – ९७. ८२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ८७.७५ टक्के
आयटीआय – ८७.६९ टक्के
बारावीचा निकाल पाहण्यासाठी पर्यायी वेबसाइट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आज २१ मे २०२४ रोजी बारावीचा निकाल त्यांना ऑनलाईन पाहता येईल. दुपारी १ वाजता विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतील. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in वेबसाइट्स व्यतिरिक्त, महाराष्ट्र बोर्डाचा एचएससी २०२४ चा निकाल results.digilocker.gov.in वर देखील उपलब्ध असेल.





