लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले! जवळपास ११ उमेदवारांवर शिक्कामोर्तब

मुंबई | एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने ११ उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केली आहे.
ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार :
- शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
- बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
हेही वाचा – वाहनचालकांना मोठा दिलासा! ‘फास्टॅग’ केवायसी अपडेट करण्यासाठी मुदत वाढवली
3. ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
4. रायगड – अनंत गीते
5. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
6. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
7. वायव्य मुंबई – अमोल कीर्तीकर
8. संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
9. धाराशिव – ओमराजे निंबाळकर
10. परभणी – संजय जाधव
11. ठाणे – राजन विचारे.





