दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यास सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आजपासून विम्याची रक्कम वितरीत करायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा – माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील कोणता अवयव किती वेळासाठी जिवंत असतो?
राज्यातील शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांकडून ‘हॅपी दिवाळी’
३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये अग्रीम पीक विम्याचे होणार वितरणराज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिवाळीपूर्वी अत्यंत गोड बातमी दिली असून, राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७००… pic.twitter.com/wGtcPp8oV1
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) November 8, 2023
धनंजय मुंडे म्हणाले, नुकसानग्रस्त क्षेत्रांचं केलेल्या सर्वेक्षणात अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनांना अनुसरून राज्यातील ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १ हजार ७४३ कोटी रुपये एवढी पीक विम्याची रक्कम वितरीत करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.




