माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील कोणता अवयव किती वेळासाठी जिवंत असतो?

Human Body Survive After Death : एखाद्या व्यक्तीचा आकस्मिक, अपघाती किंवा इतर कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास मृत्यूनंतरही त्याचे अवयव हे जिवंत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला असेही म्हणता येईल की एखाद्या गरजू व्यक्तीला ज्याला काही अवयवांची गरज आहे ते सगळे अवयव या मृत व्यक्तीच्या शरीरातून काढून गरजवंत व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सप्लांट केल्यास त्याला चांगले असे नवीन जीवन मिळू शकते. मृत व्यक्तीच्या शरीरातील अवयवांविषयी बोलायचं झालं तर माणसाच्या शरीरातील डोळे हा अवयव सर्वात कमी वेळासाठी जिवंत असतो तर माणसाच्या शरीरातील किडनी हा अवयव सर्वाधिक काळासाठी जिवंत राहू शकतो. याचाच अर्थ असा होतो की, हे दोन्ही अवयव ज्या-त्या वेळेत ट्रान्सप्लांट करता येऊ शकतात.
शरीरातील कोणता अवयव किती वेळात करावा लागतो
ट्रान्सप्लांट जेव्हा एखाद्या व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीने जर मृत्यूच्या पहिले अवयवदान कारण्यासाठीचा फॉर्म भरला असल्यास अथवा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांची अवयवदान करण्याची इच्छा असेल तर यावर त्यांना लवकरात लवकर अंमलबजावणी करणे गरजेचे असते. यामागील महत्वाचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृत्यू झाल्यांनतर त्याच्या शरीरातील प्रत्येक अवयवाची जिवंत राहण्याची एक ठराविक वेळ असते. आणि त्या ठराविक वेळेतच हे अवयव ज्याच्या शरीरात ट्रांसप्लँट करायचे आहेत त्याच्या शरीरात ट्रान्सप्लांट करणे गरजेचे असते असं डॉक्टर नेहमी सांगत असतात.
हेही वाचा – पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजीत तावरेंची निवड, कोण आहेत रणजित तावरे?
व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणते अवयव किती काळ जिवंत राहतात
- ह्रदय : मृत्यूनंतर ४ ते ६ तासांपर्यंत काम करते
- फुफ्फुस : मृत्यूनंतर ४ ते ६ तासांपर्यंत काम करते
- किडनी : मृत्यूनंतर ४८ ते ७२ तासांपर्यंत काम करते
- यकृत : मृत्यूनंतर १२ ते २४ तासांपर्यंत काम करते
- स्वादुपिंड : मृत्यूनंतर १२ ते १८ तासांपर्यंत काम करते
- आतडे : मृत्यूनंतर ६ ते १२ तासांपर्यंत काम करते
- डोळे : मृत्यूनंतर ४ ते ६ तासांपर्यंत काम करते.
यातून एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मानवी शरीरातील सर्व अवयवांपैकी डोळे हा अवयव सर्वात कमी वेळासाठी जिवंत राहतो. त्यामुळे तो अवयव मृत व्यक्तीच्या शरीरातून काढून ज्याला गरज आहे त्याच्या शरीरात ट्रान्सप्लांट करावा लागतो. हा अवयव ट्रान्सप्लांट करताना त्याच्यातून कॉर्निया आणि आयबॉल हे भाग काढून घेतले जातात. तसा विचार करायला गेलं तर एका व्यक्तीचे डोळे हे फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला जीवदान देऊ शकतात असे नाही. तर एका व्यक्तीच्या डोळ्यांचे कॉर्निया हे ३ ते ४ व्यक्तींना जीवदान देण्यासाठी उपयोगी येऊ शकतात.




