Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

एल्विश यादव याच्या समर्थनार्थ शिव ठाकरे मैदानात; म्हणाला..

मुंबई : बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव सध्या चांगलाच चर्चेत आहे. एका रेव्ह पार्टीमध्ये ५ विषारी कोब्रा सापांसोबत पार्टी केल्याबद्दल पोलिसांनी एल्विश यादव याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून अनेकजण एल्विश यादव याच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मात्र शिव ठाकरे हा एल्विश यादवच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

शिव ठाकरे म्हणाला, जेंव्हा तुम्ही खूप पुढे निघून जाता त्यावेळी अशा गोष्टी होणे फार काही गंभीर नाहीये. मला वाटते की, हे खरे नाहीये. मी एल्विश यादव याचा व्हिडीओ देखील बघितला आहे, असे काहीच नाहीये. जेंव्हा काही गोष्टी तुम्ही मिळवता तेंव्हा काही लोकांना हे आवडत नाही.

हेही वाचा – कृषी या घटकाचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील नेमके स्थान काय आहे? वाचा सविस्तर..

मला मुळात सर्व गोष्टी अजून माहिती नाहीत. मुळात म्हणजे झालेल्या आरोपांनंतर एल्विश यादव याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत थेट सांगितले की, माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. माझा या गोष्टींचा काहीच संबंध नाहीये, जर माझी यामध्ये एक टक्का देखील चूक सापडली तर मी संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल, असंही शिव ठाकरे म्हणाला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button