breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

कृषी या घटकाचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील नेमके स्थान काय आहे? वाचा सविस्तर..

Agriculture : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. जीडीपीमधील सेवा क्षेत्राचा विचार केला तर तो 55 टक्क्यांपर्यंत वाढलेला पाहायला मिळतोय. बांधकाम क्षेत्र यापासून वेगळे जरी असले तरी याचा देखील सेवा उद्योगात समावेश केला तर हा आकडा ठेव 63 टक्क्यांपर्यंत जात असल्याचं पाहायला मिळतंय. हे या चित्र जरी सध्याला पाहायला मिळत असलं तरी आपल्या देशाची ओळख अजूनही शेतीप्रधान देश म्हणूनच आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत काय आहे शेतीचे महत्व?

आपल्याला जर कृषी क्षेत्राचे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील स्थान समजून घ्यायचे असल्यास केंद्रातील आणि राज्यातील आर्थिक पाहणी अहवालातून GDP, GNP, रोजगार, आयात-निर्यात यामध्ये असणाऱ्या कृषी क्षेत्रावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. याबाबत माहिती घ्याची असल्यास आपल्याला कृषी क्षेत्राची तुलना ही उद्योग आणि सेवा क्षेत्राशी करावी लागेल. कृषी निविष्ठा म्हणून वस्तू आणि सेवा करामध्ये वापरण्यात येणाऱ्या खते आणि यंत्रे अशा उत्पादनांवर असणाऱ्या करांचे दर देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातून होणाऱ्या उत्पन्नावरील करांमध्ये कोणत्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे तसेच कोणती उत्पादने यातून वगळली आहेत, या बाबी देखील माहिती असणे गरजेचे आहे. जर करांच्या दरात बदल झाला असेल तर त्याबाबत अपडेट अशी माहिती असणे गरजेचे आहे.

हेही वाचा – ‘ड्रग्जमुफ्त महाराष्ट्र करण्याची सुरूवात मातोश्रीपासून करा’; नितेश राणे यांचं प्रत्युत्तर 

कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबत GATT आणि WTOचे महत्वाचे करार आणि त्यातील तरतुदी आणि संबंधित चालू घडामोडी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. या तरतुदी आणि घडामोडींचा भारतीय कृषी क्षेत्रावरील आणि निर्यातीवरील परिणाम समजून घ्यावा लागेल. शेतकरी आणि पैदासकारांचे हक्क आणि त्यांचे स्वरूप व अंमलबजावणी यांचा आढावा घ्यायला हवा. सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदि हे मुद्दे समग्रलक्षी अर्थशास्रातील पैसा या मुद्द्यांबरोबर अभ्यासणे योग्य ठरेल.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी आहे?

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील अर्थव्यवस्थेबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात घेतली जाणारी महत्वाची पिके, त्यांची उत्पादकता, खते आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर, जमिनीची सुपीकता, परपुरवठ्याचे स्वरूप आणि कर्जबाजारीपणा ही सगळी वैशिष्ट्ये बारकाईने समजून घेणे गरजेचे आहे. याबाबतीत संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थान समजून घ्याचे ठरल्यास आपल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील ठळक टक्केवारी पाहणे गरजेचे असते.

महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण कृषी आणि ग्रामीण पायाभूत संरचना आणि ग्रामविकासासाठीचे उपक्रम, योजना आदी बाबी या पेपर ४ मध्ये असणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या घटकाशी संबंधित आहे. त्यामुळे या सर्वांचा एकत्रित अभ्यास करणे फायद्याचं ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला शासनाच्या नव्या योजनांची इत्यंभूत माहिती असणे देखील गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button