Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबई हादरली! ठाकरे गटातील माजी नगरसेवकाची लोकलखाली आत्महत्या

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृत्यू झाल्याने मोठी एकच खळबळ उडाली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रूळांवर त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचं समजत आहे.

मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे असं त्यांनी आपल्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं आणि ते निघाले. त्यांनी बॉडीगार्डला आपल्यासोबत नेलं नव्हतं. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडे अकराच्या दरम्यान रुळावर झोपले. कल्याणवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली त्यांच्यावरून गेली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – मोदी सरकार आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेणार? 

गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॅार्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी विनंती मोरेंच्या जवळच्या लोकांनी केली आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button