Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

OMG 2 : अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ या दिवशी होणार रिलीज

Share On

OMG 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट OMG 2 ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा चित्रपट सनी देओलच्या ‘गदर २’ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनवसार समोर आले होते की OMG 2 चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. मात्र, आता बॉलिवूडच्या खिलाडीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर OMG 2 चे पोस्टरसोबत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

हेही वाचा – ‘भारतीय संघाने केली ‘ही’ मोठी चूक’; सुनील गावस्कर रोहित शर्मावर संतापले

OMG 2 या सिनेमात अक्षय कुमार सोबत यामी गैतमी आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा शिक्षण व्यवस्थेवर आधारित असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे. OMG हा सिनेमा २०१२ रोजी रिलीज झाला होता. यामध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते. हा पहिला भाग प्रेक्षकांना खूप अवडला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button