कोरोनाच्या लाटेबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा!

कोरोनाच्या लाटेबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा!

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी कोरोनाची लाट १५ मेपर्यंत संपणार असल्याचा दावा केलाय. राज्यात कालपर्यंत कोरोनाचे ११०० रुग्ण होते. रुग्णांचा हा आकडा सध्या ४६० च्या जवळ आला असल्याचे सावंत यांनी सांगितले. सध्याच्या कोरोनाचा लाटेचा धोका कमी असला तरी प्रशासनाने यासाठी तयारी पूर्ण केली आहे, असं ते म्हणाले.

तसेच hp1v६ ही कोरोनाची लाट ओसरत असून टास्क फोर्सच्या माहितीनुसार ही लाट १५ तारखेपर्यंत संपुष्टात येईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. त्याचबरोबर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचेही ते म्हणाले. सध्याच्या कोरोनाचा लाटेचा धोका कमी दिसत असून नागरिकांनी काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी, असे आवाहनही तानाजी सावंत यांनी केलं आहे.

राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या राज्यात ५ हजार २३३ रुग्ण बाधित आहेत. मुंबई महापालिकेतर्फे जेष्ठ नागरिकांना विनामुल्य लस देण्यात येत आहे. पालिकेच्या निवडक वॉर्डांमध्ये भारत बायोटेकची इन्कोव्हॅक ही नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *