Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई
घराबाहेर पडताना सावध रहा, राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : राज्याच्या काही भागांत काल दमदार पावसाने हजेरी लावली. नाशिक, पुण्यात गारपीट झाली आहे. आज पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे.
दरम्यान उन्हाचा तडाखा आणि मध्येच अचानकच कोसळणाऱ्या पाऊसधारा पाहता नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर न पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरलाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर याभागातही पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात बुलडाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही इशारा देण्यात आला आहे.





