Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निग वॉकदरम्यान हल्ला

Share On

देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी हल्ला करण्यात आला आहे. मॉर्निग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. स्टम्पच्या साहाय्याने मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे.

या हल्ल्यात संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने हिंदुजा रूगाणालयात दाखल करण्यात आलेलं आहे. देशपांडे यांना मार लागला असला तरी त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संदीप देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरीवर इतरत्र कुठेही मार लागला नाही. हल्लेखोरांना स्टम्पने हल्ला केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपल्या हाताने वार परतवून लावला. त्यांनी हल्लेखोरांना प्रतिकार केला. तेवढ्यात शिवाजी पार्कातील लोक धावले. त्यामुळे हल्लेखोर तिथून पसार झाले, असं मनसे नेते, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button