TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मेधा सोमय्या यांच्या मानहानीच्या दावाप्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबईः राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. कारण, संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दावाच्या संदर्भात कोर्टाने हे वॉरंट काढलं आहे. शिवडी दंडाधिकारी कोर्टाकडून हे अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकत शिवडी दंडाधिकारी कोर्टात तक्रार दिली आहे. या खटल्याच्या सुरुवणीस वारंवार तारखा येऊन सुद्धा संजय राऊत कोर्टात उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावा अशी मागणी सोमय्यांच्यावतीने करण्यात आली होती.

सोमय्या यांनी केलेल्या या मागणीचा विचार करुन शिवडी दंडाधिकारी कोर्टाने शुक्रवारी (6 जानेवारी 2023) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीला जर पुन्हा संजय राऊत कोर्टात हजर राहीले तर त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द होऊ शकतं. मात्र, जर संजय राऊत हे पुन्हा सुनावणीसाठी कोर्टात गैरहजर राहीले तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्राच्या संदर्भातील पुढील प्रक्रिया करण्यात येऊ शकते. संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांवर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. कथित 100 कोटी रुपयांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नाहीये असा दावा करत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group