TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे ‘मशाल’ पेटवून जल्लोष

पिंपरी : मशाल पेटवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘मशाल’ या नव्या चिन्हाचे पिंपरी चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. आकुर्डीतील शिवसेना भवनासमोर ढोलताशा वाजवत नव्या चिन्हाचे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी शिवसैनिकांनी प्रज्वलित करून आणलेल्या मशालीचे पूजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अ‍ॅड.सचिन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर श्री गणरायाचे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन झाले.
शिवसेनेचे योगेश बाबर, सुरज बाबर, संतोष वाळके, नीलेश मुटके, रोमी संधू, नीतीन बोंडे, युवराज कोकाटे, दत्तात्रेय भालेराव, संतोष सौंदणकर, सचिन सानप, सुधाकर नलावडे, शंकर कु-हाडकर, गणेश अहिर, महिला आघाडीच्या अ‍ॅड. उर्मिला काळभोर, वैशाली मराठे, अनिता तुतारे, गौरी घंटे आदी उपस्थित होते.
यावेळी ढोल ताशांच्या गजरात भगवे फेटे बांधून भगवे शेले परिधान केलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसैनिकांनी मिठाई वाटून आनंदही व्यक्त केला.यावेळी जय भवानी जय शिवराय, मशाल पेटली महाराष्ट्रात घुसली, आली रे आली मशाल आली, या गद्दारांचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group