Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर वाहतूक संथ गतीने सुरू;वीकेंडमुळे पर्यटकांची गर्दी

Share On

लोणावळा | प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (ता.२५) बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नाताळ व नववर्षानिमीत्त सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोराघाटात सुरु असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहनचालकांना शुक्रवार रात्रीपासूनच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने लोणावळा, खंडाळा परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून पर्यटकांच्या वर्दळीने पर्यटननगरी फुलून गेली आहे. यादरम्यान पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात पुणे लेनवर बोरघाट पोलीस चौकी, दस्तुरी, अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा दरम्यान तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या.वाहतूक संथ गतीने सुरु त्यामुळे दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीने वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी प्रय़त्न करण्यात येत आहे. वाहतुक सुरळीत करताना बोरघाट (दस्तुरी), खंडाळा टॅपच्या वाहतुक पोलिसांना नाकी-नऊ आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button