Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय’; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं

Share On

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. ते सकाळीच पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले होते. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी अजित पवारांनी सर्वांसमोर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडेबोल सुनावल्याचं पहायला मिळालं.

गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांचं काय, असं अजित पवार यांनी म्हटलंय.चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत कामाच्या दर्जावर अजित पवार संतापले. अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी अजित पवारांनी अधिकारी आणि कंत्राटदारालाही धारेवर धरलं.

अजित पवार यांनी कोरोना काळात योगदान दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कोविड काळात जे पोलीस मृत झाले त्यांच्या कुटुंबियांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर अजित पवार विधानभवात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button