Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

आक्षेपार्ह भाषेतील त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या….

Share On

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील 1 कोटी लसीकरणाच्या संदर्भातील होती. ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला 9 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की, कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिलं आहे. यावर संतापलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला मराठीत ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट नंतर डिलीट केलं असलं तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर त्या आक्षेपार्ह ट्विटवर किशोरी पेडणेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केलं. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button