Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डाॅक्टरला मारहाण ; पाहा व्हिडीओ

Share On

गडचिरोली – एकीकडे डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोना विरूद्ध दोन हात करत आहे. तर दुसरीकडे डाॅक्टरावर हल्ले होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. अशीच एक धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाने कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांना घाणेरडी शिवीगाळ करत हल्ला केला आणि मारहाण केली.

डॉ. अभिजीत मारबाते हे आदिवासी भागात वंचित नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत होते. मागील अनेक दिवसांपासून ते या क्षेत्रात दिवसरात्र रुग्णसेवा करत आहेत. 12 मे ला देखील डॉ. अभिजीत नियमितपणे आपलं काम करत होते. सायंकाळच्या सुमारास आनंदराव गेडाम यांचा मुलगा लाॅरेन्स गेडाम डाॅक्टरांजवळ आला आणि त्याने आपल्या घरी होम क्वारंटाईन असलेल्या आपल्या नातेवाईकासाठी गोळ्या मागितल्या.

 

डाॅक्टरांनी कोरोना नियमाप्रमाणे नातेवाईकांना सर्दी, खोकला, ताप अशी काही लक्षणं आहे का? असं विचारलं. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. औषधं घेतल्यावर लाॅरेन्स गेडामने ते पाहिली आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत ते औषधं टेबलवर फेकलं. औषधं देण्याची तुझी लायकी आहे का, अशी भाषा वापरत डाॅक्टरवर हल्ला केला. गावकऱ्यांनी देखील आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पीडित डॉ. सचिन मारबते यांनी मावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. परंतू अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. याआधीही बग्गु ताडाम यांच्या अपहरण प्रकरणी लाॅरेन्स गेडाम याच्यावर गुन्हा दाखल आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button