राज्यात कोरोनाचा धोका वाढला; 24 तासात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यु

राज्यात कोरोनाचा धोका वाढला; 24 तासात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यु

मुंबई – राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासुन आटोक्यात येणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता पुन्हा एकदा वर जाताना पाहायला मिळत आहे.

दिवसभर लाॅक़डाऊन असताना सुद्धा राज्यात तब्बल 66 हजार 159 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, गेल्या 24 तासात 771 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना काल हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबई आणि पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं होतं पण तिकडेही आता रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात 15 मे पर्यंत कडक लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. आता तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? की, नेहमीसारखं बेजबाबदार वागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच्या लाॅकडाऊनमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 4 हजार 895 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *