Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

UN Human Rightsकडूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी ट्विट

नवी दिल्ली – गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता वेगळं रूप प्राप्त होतंय. त्यातच, शेतकऱ्यांना देश-विदेशातूनही पाठिंबा मिळतोय. अमेरिकन पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसह अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता UN Human Rightsनं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करत सल्ला दिला आहे.

“आम्ही भारतातील अधिकारी व आंदोलकांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. अभिव्यक्ती अधिकार शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं सुरक्षित राखले जावेत. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे,” असं UN Human Rightsनं म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, दिल्लीतील काही परिसरात इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तर, बॅरिकेट्स आणि खिळे ठोकून रस्ते अडवण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांची हेळसांड झाल्यानेच UN Human Rightsनं ट्विट करत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

गाझीपूर, टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत असून, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं आंदोलक शेतकऱ्यांवर आरोप होत होते. त्यानंतर तिन्ही ठिकाणावरील इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. त्याचबरोबर रस्तेही बंद करण्यात आले होते. त्यावर रिहानाने आपण यावर का बोलत नाही आहोत? असा सवाल उपस्थित केला होता. त्याचबरोबर ग्रेटा आणि मिया खलिफा यांनीही पाठिंबा दिला होता. त्यावरून भारतात वेगळाच वाद उभा राहिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group