शनिवार, रविवार रात्री कोपरी पुलावरील वाहतूकीत बदल

शनिवार, रविवार रात्री कोपरी पुलावरील वाहतूकीत बदल

ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर लोखंडी तुळई बसविण्याचे काम येत्या शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस रात्रीच्या वेळेत करण्यात येणार आहे. या कामामुळे दोन्ही दिवशी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोपरी पुलावरून होणारी वाहतूक मॉडेला चेक नाका, कळवा, शीळफाटा आणि नवी मुंबई मार्गे वळविण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेत सुरू असणाऱ्या  वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी रात्रीच्या वेळेत वाहतूक बदल लागू करण्यात आले असले तरी याचा परिणाम ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील रस्ते वाहतुकीवर जाणवण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली असते. त्यामुळे पर्यायी मार्गावर वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *