Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड

हुंडाबळी ! विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

पिंपरी । प्रतिनिधी

हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 15 जुलै ते 19 डिसेंबर 2020 या कालावधीत लातूर व भोसरी येथे घडली.

विद्या तुकाराम मुद्रासे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचे वडील उत्तम राजेश्वर मोकाशी (वय 51, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पती तुकाराम चंद्रकांत मुद्रासे (वय 27, रा. पांडवनगर भोसरी, मुळगाव कलकोटी, लातूर), सासु उर्मिला चंद्रकांत मुद्रासे (वय 48), सासरे चंद्रकांत बाबू मुद्रासे (वय 51), नणंद महादेवी दत्तात्रय मोकाशे (वय 24), चुलत नणंद शामा शिवराम मोकाशे (वय 23) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या आणि तुकाराम यांचा 14 जुलै 2020 रोजी विवाह झाला. विद्याचा पतीसह सासरच्या लोकांनी सोनं, प्रापंचिक भांडी, इतर वस्तू माहेरून घेऊन यावे यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला मारहाण केली व घरात भांडणे लावण्यासाठी फुस दिली. सासरच्या जाचाला कंटाळून विद्याने 19 डिसेंबर रोजी घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. विवाहितेचा हुंड्यासाठी बळी घेतला म्हणून पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावर्डे अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button