Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलींचे अपहरण, एकीवर अत्याचार तर एकीचा विनयभंग, निगडीतील धक्कादायक प्रकार

Share On

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यासोबत असणाऱ्या मावस बहिणीचा विनयभंग करत अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून बुधवारी उशिरा उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी करण भैरवनाथ साबळे (२१), आशिष आनंद सरोदे (२०), निवास संजय सुतार (२०), तेजस राजू वाघमारे (१९), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “निगडी परिसरात अल्पवयीन मुलीवर आरोपी आशिष आनंद सरोदे याने लौंगिक अत्याचार केला. तिच्यासोबत असलेल्या मावस बहिणीचा आरोपीचा मित्र करण भैरवनाथ साबळे याने विनयभंग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपींनी इतर तीन मित्रांना बोलावून आपापसात कट रचून दोन्ही मुलींचे अल्टो मोटारीतून अपहरण करून चिंचवड येथे नेल्याचं पीडितने सांगितलं आहे”. पीडित मुलींनी घऱी गेल्यानंतर कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button