Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जावेद खान यांचे निधन

मुंबई – काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जावेद खान यांचे कूपर रुग्णालयात उपचारादरम्यान काल शनिवारी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. जुहू येथील मुस्लिम मजलीस कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी पार पडला.
मूळचे उत्तर प्रदेशमधील जौनपूरचे असलेले जावेद खान हे प्राध्यापक होते. जावेद खान हे काँग्रेस मधून १९८५ आणि १९९० मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात ते शिक्षण राज्यमंत्री होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस सोडली होती. पण नंतर २०११ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले होते.





