आंतरराष्ट्रीय हवाई आणि समुद्री प्रवासाला सरकारने दिली परवानगी

आंतरराष्ट्रीय हवाई आणि समुद्री प्रवासाला सरकारने दिली परवानगी

नवी दिल्ली – कोरोनाचा जोर कमी झालेला नसला तरीही केंद्र सरकारकडून अनेक गोष्टींना परवानगी दिली जात आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत आता आंतरराष्ट्रीय हवाई आणि समुद्री प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आता व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

https://twitter.com/ANI/status/1319181455344295936?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1319181455344295936%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_0&ref_url=http%3A%2F%2Fenavakal.com%2Fmha-permits-entry-of-all-international-travellers-except-on-a-tourist-visa-to-enter-by-air-or-water-routes%2F

इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. परदेशी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी भारतात यायचे असेल, तर ते त्यांच्यासह देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करु शकतात.

व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *