Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

RR vs KKR | राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, राजस्थानला विजयाची हॅट्रीक मारण्याची संधी

आयपीएलच्या 13व्या सीजनचा 12वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान दुबईमध्ये होत आहे. राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने यापूर्वीचे दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता राजस्थानला विजयाची हॅट्रीक मारण्याची संधी आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

दोन्ही संघात कोणतेच बदल करण्यात आले नाही. राजस्थानमध्ये जोस बटलर, स्टीव स्मिथ, जोफ्रा आर्चर आणि टॉम करन परदेशी खेळाडू आहेत. तर, कोलकातामध्ये सुनील नरेन, इयोन मोर्गन, आंद्रे रसेल आणि पॅट कमिंस आहेत.

लीगमधील सर्वात महाग खेळाडू केकेआरच्या पॅट कमिंसकडे ओव्हरऑल टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे. कमिंस आपल्या 100 विकेट्स घेण्यापासून फक्त दोन विकेट्स दूर आहे. यापूर्वी राजस्थानने आपल्या मागील सामन्यात लीगचे सर्वात मोठे टार्गेट चेज केले होते.

कोलकाता | शुभमन गिल, सुनील नरेन, नीतीश राणा, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), इयोन मोर्गन, आंद्रे रसेल, पैट कमिंस, शिवम मावी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी.

राजस्थान | जोस बटलर (विकेटकीपर), स्टीव स्मिथ (कर्णधार), संजू सैमसन, राहुल तेवतिया, रॉबिन उथप्पा, रियान पराग, जोफ्रा आर्चर, टॉम करन, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत आणि जयदेव उनादकट.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button