Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अलका कुबल यांची सोशल मीडियावर एक पोस्ट; म्हणाल्या “लोकांनी मलाही श्रद्धांजली वाहिली”

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या सेटवर काही जण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचंही करोनामुळे निधन झालं.

याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या आशालता यांच्यासोबत होत्या. त्यामुळे अलका कुबल यांनाही करोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पण खुद्द अलका यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. अलका कुबल यांनी त्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये बऱ्याचं गोष्टी सांगतिल्या आहेत . तसेच त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की, काही लोकांनी मलाही श्रद्धांजली वाहिली.पाहुयात नेमकं त्या काय म्हणाल्या आहेत.





