Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार

Share On

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सन 2017 ते मार्च 2020 या कालावधीत घडली आहे. गोविंद माने (वय 31, रा. नवी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी गोविंद याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करत महिलेला मारहाण केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button