#Covid-19 राज्यात ऑक्सिजनच्या काळा बाजारावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितली ‘वस्तुस्थिती’

मुंबई: देशात कोरोनाचा विस्फोट झालेला आहे. त्यात राज्यात मृत्यू आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झालेली आहे. त्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं की, पुणेसह सहा ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सुरू करणार आहेत. राज्यात काही शहरात ऑक्सिजनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाली आहे. लोकांना 19 रुपयांपेक्षा जास्त दरात कोणी ऑक्सिजनची विक्री करत असेल तर औषध प्रशासन विभाग तक्रार करावी. काळा बाजार करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
पुढील काळात ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी नवीन केंद्र सुरू करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलेली आहे. राज्यात काही ठिकाणी पुणे, नागपूर शहरात आयसीयू व्हेनेटिलेटर बेड मिळत नाही, हे खरे आहे. मुंबईत मात्र, अशी परिस्थती नाहीय. खासगी रूग्णालयात जास्त पैसे देऊन काही लोक बेड अडवून ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आरोग्य विभाग यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात डीपीडीसी आणि आमदार खासदर फंड यातून आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यास प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असेही यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे.





