Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती.

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयालर पालिकेनं आज (९ सप्टेंबर) सकाळी कारवाई सुरू केली. अवैध बांधकाम प्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिशीला २४ तास उलटून गेल्यानं पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कंगणासाठी हा मोठा दिलासा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button