Breaking-newsताज्या घडामोडी

जालन्यात एकता कपूरविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

जालना – एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्मद्वारे निर्मित ‘व्हर्जिन भास्कर सीजन टू’ या वेब सीरिजमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा मलिन करणारे दृश्य दाखवल्याबाबत भाजपाकडून आज सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपा कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात एकता कपूरच्या छायाचित्राला चप्पला मारण्यात आल्या.

या वेब सीरिजचे निर्माते शोभा कपूर व एकता कपूर आणि दिग्दर्शक साक्षात दळवी व संगीता राव यांच्याविरुद्ध महापुरुषांचा अवमान करणे. दोन समाजात तेढ निर्माण करणे, आदि कलमान्वये गुन्हा दाखल करून या वेब सिरीजचे प्रक्षेपण त्वरित बंद करण्यात यावे, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली.

प्रौढांसाठी असलेल्या या वेब सीरिजमध्ये अश्लील ठिकाणाला ‘अहिल्याबाई लेडीज होस्टेल’ हे नाव देण्यात आले आहे. खरे तर हे नाव पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या नावाने देशातील नीतिमान राज्यकर्त्यांच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. त्यामुळे त्यांचे नाव आदराने घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी मुद्दाम पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असल्याचा आरोपही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group