Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली – रोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची माहिती देणारे तसेच, इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी सतत देशाला संबोधित करणारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत:हून ट्विटरद्वारे माहिती दिली असून ते सध्या गृह अलगीकरणात आहेत.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी गृह अलगीकरणात आहे. माझ्या सोबत कार्यरत असलेले कर्मचारी आणि मित्रांनी स्वत:कडे लक्ष द्यावं. संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाईल,” अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button