Breaking-news
पंढरपूरमध्ये ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान लॉकडाउन

पंढरपूर – देशभरासह राज्यात एकीकडे लॉकडाउनचे निर्बंध उठवले जात असताना, दुसरीकडे पंढरपूरमध्ये मात्र सहा दिवसांसाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर आणि शेजारील काही गावांमध्ये काल मध्यरात्रीपासून म्हणजेच ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याअगोदर आषाढीवारी दरम्यान ३ दिवसांची संचारबंदी लागू केली होती.
दरम्यान, लॉकडाउनच्या कालावधीत पंढरपूर शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या परिसरात व्यापक प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. सात दिवसात कोरोना संसर्ग रोखण्यात कितपत यश येते, याचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल’असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले आहे.





