Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: अमित शाहांना कोरोना, आता जनतेला क्वारंटाईन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? काँग्रेसचा सवाल

Share On

नवी दिल्ली: गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता अयोध्यामध्ये 5 ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाला शाह उपस्थित राहण्याची शक्यता कमी झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रश्न विचारला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळच्या बैठकीत सोबत उपस्थित होते. आता जनतेला क्वारंटाईन करणारे मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? असा सवाल युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना घेरलेलं आहे.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वारंटाईन होणार की फक्त जनतेला क्वारंटाईन करणार असा सवाल केलेला आहे. श्रीनिवास म्हणाले, “बुधवारी (29 जुलै) झालेल्या कॅबिनेट बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान शेजारी बसले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का? की नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत?”

श्रीनिवास यांनी आपल्या इतर काही ट्विटमध्ये कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी ठरल्याचाही आरोप केलेला आहे. आतापर्यंत देशातील 18 लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आता गृहमंत्री अमित शाह यांना आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा. मात्र, कोरोनाचा 21 दिवसात नायनाट करणार म्हटले ते 21 दिवस कधी संपणार आहेत? असा प्रश्न श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे.

आतापर्यंत गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री, डॉक्टर, पोलिसांसह 18 लाख भारतीयांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे देशात सरकार अस्तित्वात आहे की सर्वकाही आत्मनिर्भर आहे? असा प्रश्न उपस्थित करत श्रीनिवास यांनी मोदी सरकारला घेरतरलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button