Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रकांतदादा.. मातोश्रीवर टीका कराल, तर शेवट नारायण राणेंसारखा होता – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर |प्रतिनिधी|

मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला. त्यांनी सोमवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर विचारपूर्वक टीका करावी, असे क्षीरसागर यांनी म्हटले.

तसेच चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला बाईट दिला का, हे सांगावे, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button